मालेगाव महानगरपालिकेतर्फे कॅन्सर रुग्णांची मोफत तपासणी
कॅम्प नागरी आरोग्य केंद्रातर्फे गर्भवती महिलांना कोवीड-१९ चे व्हॅक्सिनेशन
मा.आयुक्त, भालचंद्र गोसावी मा.उपायुक्त (विकास), राजू खैरनार, मा.आरोग्याधिकारी डॉ. सपना ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने आरोग्य विभागा अंतर्गत संगमेश्वर नागरी आरोग्य केंद्रातर्फे खालील ठिकाणी शिबिर घेऊन गर्भपिशवीचा तोंडाचा कॅन्सर (Cervical cancer),
स्तनाचा कॅन्सर (Breast cancer), तोंडाचा कॅन्सर (Oral cancer) या
रुग्णांची मोफत तपासणी करून औषध गोळ्यांचेही मोफत वाटप करण्यात आले.
या शिबिरासाठी नाशिक मानवता कॅन्सर हॉस्पिटल येथील तज्ञ डॉ.गरीमा व मंजुषा पाटिल, (camp co-ordinator) त्यांच्या टीमने तसेच मालेगाव येथील स्त्री रोग तज्ञ डॉ.अविनाश आहेर, बालरोग तज्ञ डॉ. धनश्री देवरे,RCH ऑफिसर डॉ.अलका भावसार, वैद्यकीय अधिकारी निमा सूर्यवंशी यांनी शिबिराच्या ठिकाणी उपस्थित राहून रुग्णांशी संवाद साधला व नागरिकांना याबाबत योग्य ते मार्गदर्शन केले.
सदर शिबिरासाठी संगमेश्वर नागरी आरोग्य केंद्र येथील सर्व स्टाफ अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेऊन शिबिर यशस्वीरित्या पार पाडले.
तसेच इतर नागरी आरोग्य केंद्रातही कॅन्सर रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येणार असल्याने नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान डॉ.सपना ठाकरे यांच्या तर्फे करण्यात येत आहे.
*शिबीरांचे ठिकाण व रुग्ण तपासणी संख्या*
१) दि.२९/११/२०२१ रोजी डॉ.नाजीम दवाखाना, बाग. ए. महेमूद (रुग्ण संख्या- २६४)
२) दि. ३०/११/२०२१ रोजी गणपती मंदिर, शरद नगर कलेक्टर पट्टा
(रुग्ण संख्या- १००)
३) दि.०२/१२/२०२१ रोजी
श्रीराम मंदिर सावता चौक, संगमेश्वर
(रुग्ण संख्या- ४७)
४) दि.०३/१२/२०२१ रोजी हुतात्मा स्मारक वाचनालय, श्रीराम नगर
(रुग्ण संख्या- ९२)
कॅम्प नागरी आरोग्य केंद्रातर्फे गर्भवती महिलांना कोवीड-१९ चे व्हॅक्सिनेशन
मा.आयुक्त, भालचंद्र गोसावी मा.उपायुक्त (विकास), राजू खैरनार, मा.आरोग्याधिकारी डॉ. सपना ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने आरोग्य विभागा अंतर्गत कॅम्प नागरी आरोग्य केंद्रातर्फे नामांकित डॉक्टर शशिकांत वाव्हळ, मालेगाव कॅम्प यांच्या हॉस्पिटलमध्ये *१०* गर्भवती महिलांचे लसीकरण करण्यात आले.
लसीकरणा वेळी डॉक्टर शशिकांत वाव्हळ व वैद्यकीय अधिकारी डॉ. सूनिता रोकडे यांनी कोरोना आजारावरील कोविड-१९ लसीकरणाबाबतच्या अफवांना बळी न पडता सर्व नागरिकांनी तसेच खास करून गर्भवती महिलांनी आपल्या व आपल्या बाळाच्या निरोगी आरोग्यासाठी कोविड-१९ चे लसीकरण त्वरित करून घ्यावे असे आवाहन केले.
लसीकरण प्रसंगी उपस्थित डॉ. शशिकांत वाव्हळ डॉ.हेमांगी वाव्हळ,
तसेच कॅम्प नागरी आरोग्य केंद्राचे सुरेखा जगताप (PHN), अनिता खैरनार (GNM), वृषाली सोनवणे (मिश्रक), व इतर स्टाफ कर्मचारी उपस्थित होते.
*कॅम्प नागरी आरोग्य केंद्रातर्फे गर्भवती महिलांना कोवीड-१९ चे व्हॅक्सिनेशन*

No comments:
Post a Comment