Wednesday, 1 December 2021

स्वच्छ सर्वेक्षण माझी वसुंधरा अभियान मालेगाव महानरपालिका मालेगाव

स्वच्छ सर्वेक्षण माझी वसुंधरा अभियान 
मालेगाव महानरपालिका मालेगाव
आज दिनांक 1 डिसेंबर 2021 रोजी  मा.आयुक्त श्री.भालचंद्र गोसावी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत अभियान(नागरी) व माझी वसुंधरा आभियान 2.0 अंतर्गत मालेगाव शहरात स्वच्छता मोहीम' चे आयोजन करण्यात आले होते.सदर मोहिमेत शहरातील दरेगाव(मुत्तलिब पेट्रोल पंप) ते मोसम पूल (महात्मा फुले पुतळा) मालेगाव या 5 कि.मी. लांबीच्या  रस्त्याची,डिवाईडरची आणि नाल्यांची  साफसफाई करण्यात आली.या मोहिमेत संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला.यावेळी माझी वसुंधरा आभियान शपथ(Pledge) घेण्यात आली.यामोहिमेत श्री.अनिल पारखे(सहाय्यक आयुक्त स्वच्छता),श्री.इकबाल जान मोहम्मद(प्रमुख स्वच्छता निरीक्षक),श्री.अक्षय थोरात(शहर समन्व्यक),श्री.इसा गुलाब बेग(वि.स्व.निरीक्षक),श्री.सुनील गंगावणे(वि.स्व.निरीक्षक),प्रभाग क्रमांक 2 व प्रभाग क्रमांक 3 चे सर्व स्वच्छता निरीक्षक ,मुकादम,सफाईमित्र(सफाई कर्मचारी) आणि शहरातील नागरिक आदी.  सर्वानी मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला होता.सदर स्वच्छता मोहीम बाबत  मालेगाव शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

No comments:

Post a Comment

आमदार फारूक शाह यांच्या विकास कामांचा धडाका सुरूच.

आमदार फारूक शाह यांच्या विकास कामांचा धडाका सुरूच. महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयी सुविधांचा विकास योजने अंतर्गत धुळे शहरासाठी ५ कोटी मंज...