Saturday, 18 December 2021

आमदार फारूक शाह यांच्या विकास कामांचा धडाका सुरूच.

आमदार फारूक शाह यांच्या विकास कामांचा धडाका सुरूच.

महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयी सुविधांचा विकास योजने अंतर्गत धुळे शहरासाठी ५ कोटी मंजूर.

आमदार फारूक शाह यांनी मानले उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे आभार..


           (धुळे दि. १८ डिसेंबर २०२१) धुळे शहरातील विविध भागातील नागरिकांनी आमदार फारूक शाह यांना प्रत्यक्ष भेटून नागरी सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी केलेल्या होत्या. यात शहरात ठिकाणी पावसाचे पाणी तुंबत असून चिखलात पडून अनेक नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते. रस्ते व गटार नाही असे अनेक प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. अश्या ठिकाणी  नविन काँक्रीट गटार आणि काँक्रीट रस्ते व्हावे अशी परीसरातील रहिवाश्यांची आणि तेथून वाहतूक करणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर मागणी होती. याठिकाणी गटार आणि रस्ते नसल्याने नागरिकांची पावसाळ्यात तारांबळ होत होती. येणा-जाणाऱ्या नागरिकांना त्या रोड वरून जातांना लहान मोठे खड्डे व जमेलेले पाणी यातून वाहने घेऊन जाणे या सारख्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. या ठिकाणच्या नागरिकांची अडचण लक्षात घेऊन आमदार फारूक शाह यांनी नागरिकांना आश्वासन दिले होते कि आपल्याकडे लवकरात लवकर गटारीचे आणि रस्त्याचे काम मंजूर करू आणि सुरु देखील करू. त्याच शब्दाला जागून आज आमदार फारूक शाह यांनी महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयी सुविधांचा विकास योजने अंतर्गत धुळे शहरासाठी ५ कोटी मंजूर करून आणले आहेत. यासाठी आमदार फारूक शाह यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित दादा पवार यांच्याकडे साकडे घातले होते आणि  सातत्याने पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याला यश आले असून धुळे महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयी सुविधांचा विकास योजने अंतर्गत धुळे शहरासाठी ५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. सदरचे काम मंजूर केल्याबद्दल धुळे शहराचे आमदार फारूक शाह यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे आभार मानले आहेत. गेल्या काही दिवसांपासून आमदार फारूक शाह यांनी विकास कामे मंजूर करून आण्याण्याचा धडाका लावला आहे. 



Tuesday, 7 December 2021

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे राष्ट्रीयअध्यक्ष म.पवार साहेब आप जियो हजारो साल

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे राष्ट्रीयअध्यक्ष म.पवार साहेब आप जियो हजारो साल

         आज मालेगाव शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(सेवादल विभाग)
च्या वतीने पवार साहेबांचा   वाढदिवसाच्या निमित्ताने  *डोळ्यांचा मोफत तपासणी शिबीर*आयोजित करण्यात आला असून आज सकाळीं ११  वाजता राष्ट्रवादी काँग्रेस  पार्ट चे जिल्हाध्यक्ष आसिफ शेख यांनी  शिबिराचे उदघाटन केले. या  पवार साहेबांचा वाढ दिवसांच्या निमित्ताने  या शिबिरात परिसरातील ३०० महिला पुरूष वयोवृद्ध नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली.
           आजच्या या शिबिराचे अध्यक्ष सेवादाल चे वरीष्ठ राजू पहेलवान हे होते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महासचिव, शरीफ मन्सूरी, सेवादल अध्यक्ष,रियाज अली,राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे अध्यक्षा, यास्मिन सैय्यद, गुरुवार वॉर्ड  ब्लॉक अध्यक्ष मुझफ्फर गाझी, बाबू भाई,अहद मेंबर अली अहमद भाई व इतर कार्यकर्ते ,नागरिक  मोठ्या संख्येत हजर होते।
शकील बेग
समनव्यक,मालेगाव शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

Thursday, 2 December 2021

मालेगाव महानगरपालिकेतर्फे कॅन्सर रुग्णांची मोफत तपासणीकॅम्प नागरी आरोग्य केंद्रातर्फे गर्भवती महिलांना कोवीड-१९ चे व्हॅक्सिनेशन

मालेगाव महानगरपालिकेतर्फे कॅन्सर रुग्णांची मोफत तपासणी


कॅम्प नागरी आरोग्य केंद्रातर्फे गर्भवती महिलांना कोवीड-१९ चे व्हॅक्सिनेशन

मा.आयुक्त, भालचंद्र गोसावी मा.उपायुक्त (विकास), राजू खैरनार, मा.आरोग्याधिकारी डॉ. सपना ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने आरोग्य विभागा अंतर्गत संगमेश्वर नागरी आरोग्य केंद्रातर्फे खालील ठिकाणी शिबिर घेऊन गर्भपिशवीचा तोंडाचा कॅन्सर (Cervical cancer), 
स्तनाचा कॅन्सर (Breast cancer), तोंडाचा कॅन्सर (Oral cancer) या
 रुग्णांची मोफत तपासणी करून औषध गोळ्यांचेही मोफत वाटप करण्यात आले. 
या शिबिरासाठी नाशिक मानवता कॅन्सर हॉस्पिटल येथील तज्ञ डॉ.गरीमा व मंजुषा पाटिल, (camp co-ordinator) त्यांच्या टीमने तसेच मालेगाव येथील स्त्री रोग तज्ञ डॉ.अविनाश आहेर, बालरोग तज्ञ डॉ. धनश्री देवरे,RCH ऑफिसर डॉ.अलका भावसार, वैद्यकीय अधिकारी निमा सूर्यवंशी यांनी शिबिराच्या ठिकाणी उपस्थित राहून रुग्णांशी संवाद साधला व नागरिकांना याबाबत योग्य ते मार्गदर्शन केले.
सदर शिबिरासाठी संगमेश्वर नागरी आरोग्य केंद्र येथील सर्व स्टाफ अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेऊन शिबिर यशस्वीरित्या पार पाडले. 
तसेच इतर नागरी आरोग्य केंद्रातही कॅन्सर रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येणार असल्याने नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान डॉ.सपना ठाकरे यांच्या तर्फे करण्यात येत आहे.

*शिबीरांचे ठिकाण व रुग्ण तपासणी संख्या*
१)  दि.२९/११/२०२१ रोजी डॉ.नाजीम दवाखाना, बाग. ए. महेमूद (रुग्ण संख्या- २६४)
२) दि. ३०/११/२०२१ रोजी गणपती मंदिर, शरद नगर कलेक्टर पट्टा
(रुग्ण संख्या- १००)
३) दि.०२/१२/२०२१  रोजी
श्रीराम मंदिर सावता चौक, संगमेश्वर
(रुग्ण संख्या- ४७)
४) दि.०३/१२/२०२१ रोजी हुतात्मा स्मारक वाचनालय, श्रीराम नगर
(रुग्ण संख्या- ९२)

कॅम्प नागरी आरोग्य केंद्रातर्फे गर्भवती महिलांना कोवीड-१९ चे व्हॅक्सिनेशन
मा.आयुक्त, भालचंद्र गोसावी मा.उपायुक्त (विकास), राजू खैरनार, मा.आरोग्याधिकारी डॉ. सपना ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने आरोग्य विभागा अंतर्गत कॅम्प नागरी आरोग्य केंद्रातर्फे नामांकित डॉक्टर शशिकांत वाव्हळ, मालेगाव कॅम्प यांच्या हॉस्पिटलमध्ये *१०* गर्भवती महिलांचे लसीकरण करण्यात आले.
लसीकरणा वेळी डॉक्टर शशिकांत वाव्हळ व वैद्यकीय अधिकारी डॉ. सूनिता रोकडे यांनी कोरोना आजारावरील कोविड-१९ लसीकरणाबाबतच्या अफवांना बळी न पडता सर्व नागरिकांनी तसेच खास करून गर्भवती महिलांनी आपल्या व आपल्या बाळाच्या निरोगी आरोग्यासाठी कोविड-१९ चे  लसीकरण त्वरित करून घ्यावे असे आवाहन केले.
लसीकरण प्रसंगी उपस्थित डॉ. शशिकांत वाव्हळ डॉ.हेमांगी वाव्हळ,
तसेच कॅम्प नागरी आरोग्य केंद्राचे  सुरेखा जगताप (PHN), अनिता खैरनार (GNM), वृषाली सोनवणे (मिश्रक), व इतर स्टाफ कर्मचारी उपस्थित होते.

*कॅम्प नागरी आरोग्य केंद्रातर्फे गर्भवती महिलांना कोवीड-१९ चे व्हॅक्सिनेशन*
मा.आयुक्त, भालचंद्र गोसावी मा.उपायुक्त (विकास), राजू खैरनार, मा.आरोग्याधिकारी डॉ. सपना ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने आरोग्य विभागा अंतर्गत कॅम्प नागरी आरोग्य केंद्रातर्फे नामांकित डॉक्टर शशिकांत वाव्हळ, मालेगाव कॅम्प यांच्या हॉस्पिटलमध्ये *१०* गर्भवती महिलांचे लसीकरण करण्यात आले.
लसीकरणा वेळी डॉक्टर शशिकांत वाव्हळ व वैद्यकीय अधिकारी डॉ. सूनिता रोकडे यांनी कोरोना आजारावरील कोविड-१९ लसीकरणाबाबतच्या अफवांना बळी न पडता सर्व नागरिकांनी तसेच खास करून गर्भवती महिलांनी आपल्या व आपल्या बाळाच्या निरोगी आरोग्यासाठी कोविड-१९ चे  लसीकरण त्वरित करून घ्यावे असे आवाहन केले.
लसीकरण प्रसंगी उपस्थित डॉ. शशिकांत वाव्हळ डॉ.हेमांगी वाव्हळ,
तसेच कॅम्प नागरी आरोग्य केंद्राचे  सुरेखा जगताप (PHN), अनिता खैरनार (GNM), वृषाली सोनवणे (मिश्रक), व इतर स्टाफ कर्मचारी उपस्थित होते.

Wednesday, 1 December 2021

स्वच्छ सर्वेक्षण माझी वसुंधरा अभियान मालेगाव महानरपालिका मालेगाव

स्वच्छ सर्वेक्षण माझी वसुंधरा अभियान 
मालेगाव महानरपालिका मालेगाव
आज दिनांक 1 डिसेंबर 2021 रोजी  मा.आयुक्त श्री.भालचंद्र गोसावी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत अभियान(नागरी) व माझी वसुंधरा आभियान 2.0 अंतर्गत मालेगाव शहरात स्वच्छता मोहीम' चे आयोजन करण्यात आले होते.सदर मोहिमेत शहरातील दरेगाव(मुत्तलिब पेट्रोल पंप) ते मोसम पूल (महात्मा फुले पुतळा) मालेगाव या 5 कि.मी. लांबीच्या  रस्त्याची,डिवाईडरची आणि नाल्यांची  साफसफाई करण्यात आली.या मोहिमेत संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला.यावेळी माझी वसुंधरा आभियान शपथ(Pledge) घेण्यात आली.यामोहिमेत श्री.अनिल पारखे(सहाय्यक आयुक्त स्वच्छता),श्री.इकबाल जान मोहम्मद(प्रमुख स्वच्छता निरीक्षक),श्री.अक्षय थोरात(शहर समन्व्यक),श्री.इसा गुलाब बेग(वि.स्व.निरीक्षक),श्री.सुनील गंगावणे(वि.स्व.निरीक्षक),प्रभाग क्रमांक 2 व प्रभाग क्रमांक 3 चे सर्व स्वच्छता निरीक्षक ,मुकादम,सफाईमित्र(सफाई कर्मचारी) आणि शहरातील नागरिक आदी.  सर्वानी मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला होता.सदर स्वच्छता मोहीम बाबत  मालेगाव शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

आमदार फारूक शाह यांच्या विकास कामांचा धडाका सुरूच.

आमदार फारूक शाह यांच्या विकास कामांचा धडाका सुरूच. महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयी सुविधांचा विकास योजने अंतर्गत धुळे शहरासाठी ५ कोटी मंज...