शिक्षण दिन निमित्ताने मौलाना आझाद दिवाळी विशेषांकाचे मालेगावी गुरुवारी प्रकाशन
मालेगाव : राष्ट्र सेवा दल , अ. भा. समाजवादी शिक्षण हक्क सभा, पुणे द्वारा शिक्षण दिनानिमित्त *मौलाना आझाद विशेषांक प्रकाशन* कार्यक्रम आयोजित केला आहे. गुरुवार, दि. ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वा. भारताचे पहिले शिक्षण मंत्री स्वा. सै. मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती निमित्त अ. भा. समाजवादी शिक्षक हक्क सभा द्वारा मौलाना आझाद दिवाळी विशेषांक प्रकाशन केले जात आहे.
यावेळी राष्ट्र सेवा दल राज्य कार्याध्यक्ष *अर्जुन कोकाटे अध्यक्षस्थानी असतील. प्रा.शरद जावडेकर, जेष्ठ मार्गदर्शक ताऊ परदेशी, राजेंद्र भोसले आणि मालेगाव जिल्हा कार्याध्यक्ष विलास वडगे* यांचे प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमास आपण सत्यशोधक मैदान गणेश वाचनालय संगमेश्वर येथे अगत्याने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्र सेवा दल, छात्र भारती, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पुरोगामी विचारमंच, हम हिंदुस्थानी एकता संघटन, साधना कलामंच, साथी दत्ता वडगे पुस्तक पेढी या संस्था व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment