साधना कलामंच, मालेगाव वसंतोत्सवाचे आयोजन
मालेगाव- स्वातंत्र्य सैनिक, लेखक, सृजनशील कवी, ७२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कविवर्य प्रा. वसंत बापट यांच्या कवितांचे अभिवाचन म्हणजेच वसंतोत्सवाचे आयोजन येथील साधना कलामंच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रा. बापट यांचे बिजली, सकीना
मानसी, अकरावी दिशा, सेतू, मेघह्रदय आदी विविध काव्यसंग्रह प्रकाशित झालेत. तसेच बालकविता, "उत्तुंग आमुची उत्तर सीमा" या सारखी अनेक समरगीते लोकांना आजही आवडतात.
प्रा. बापट यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या कवितांना उजाळा देण्यात येईल. राष्ट्र सेवा दल, साधना सर्कल, पुरोगामी लेखक संघ, मालेगाव मराठी साहित्य संघ, महात्मा फुले शिक्षण संस्था, अभिनव सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम रविवार (दि १० आॅक्टो.) गांधी जयंती निमित्त दुपारी ३.३० वा . कर्म या. ना. जाधव विद्यालयाच्या (संगमेश्वर, मालेगाव) प्रांगणात मालेगावातील कवी, गायक प्रा. बापट यांच्या विविध रसातील कवितांचे अभिवाचन करतील. या कवितांचा आनंद मालेगावकरांनी घ्यावा, असे आवाहन साधना कलामंच चे संस्थापक प्रवीण वाणी यांचेसह विविध समविचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment