Thursday, 7 October 2021

कोव्हीड -१९ व्हॅक्सिनेशन जनजागृती करणे कामी मालेगाव महानगरपालिकेस सेव्ह द चिल्ड्रन या संस्थेमार्फत दोन व्हॅन

कोव्हीड -१९ व्हॅक्सिनेशन जनजागृती करणे कामी मालेगाव महानगरपालिकेस सेव्ह द चिल्ड्रन या संस्थेमार्फत दोन व्हॅन
covid-19 व्हॅक्सिनेशन जनजागृती करणे कामी मालेगाव महानगरपालिकेस "सेव्ह द चिल्ड्रन्स" या संस्थेने व्हॅन उपलब्ध करून दिले असून त्यांचे उद्घाटन दिनांक ०५/१०/२०२१ बुधवार रोजी मा. महापौर यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी मा.महापौर ताहेरा शेख रशीद, मा.आरोग्य अधिकारी सपना ठाकरे तसेच  R.C.H. ऑफिसर अलका भावसार यांनी जनतेला आवाहन केले.*
*मा.ताहेरा शेख रशीद,महापौर :-
सेव्ह द चिल्ड्रन्स या संस्थेने मालेगाव महानगरपालिकेस वेळोवेळी मदत करीत असल्याने त्यांचे काम उल्लेखनीय असल्याबाबत कौतुक केले.
मालेगाव शहरातील सर्व नागरिकांनी लसीकरण करून आपले शहर कोरोना मुक्त करण्यास सहकार्य करावे.(W.H.O.) जागतीक आरोग्य संघटना यांनी कोवीड-१९ ची तीसरी लाट येण्याची संभावना असल्याची शक्यता वर्तवली असुन यामुळे शहरातील सर्व नागरिकांनी आपली व आपल्या कुंटुबाची सुरक्षेसाठी कोवीड-१९ प्रतिबंधक लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे. लस बाबत कुठलीही भीती बाळगू नये व आम्ही व आमच्या कुटूंबियांनी लस घेतलेली असून आम्ही सुरक्षित आहे व आपण ही लस घेऊन सुरक्षित रहावे .शहरातील नागरिकांनी आरोग्य केंद्र तसेच आपल्या घराजवळ असलेले कोवीड लसीकरण केंद्र या ठिकाणी जावून  आपल्या कुटुंबा समवेत लसीकरण करुन घ्यावे.


*मा.सपना ठाकरे,*
*आरोग्याधिकारी:-*
covid-19 व्हॅक्सिनेशन करिता सेव्ह द चिल्ड्रन या संस्थेने मालेगाव महानगरपालिकेस ०२ व्हॅन उपलब्ध करून दिले असून हे व्हॅन मालेगाव शहरातील पूर्व भागातील जनतेसाठी उर्दू माध्यमातून व पश्‍चिम भागातील जनतेसाठी मराठी माध्यमातून संपूर्ण ठिकाणी फिरणार असुन जनतेला  व्हॅक्सिन घेण्यास प्रवृत्त करणेकामी होणार आहे. मालेगाव महानगरपालिका कार्यक्षेत्रातील लसीकरणाचे प्रमाण फक्त २१% असुन इतर जिल्ह्यापेक्षा फारच कमी प्रमाणात आहे यात प्रथम डोस २१% झाले असून याचे प्रमाण १००% कसे करता येईल ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. 
कोव्हीड-१९ व्हॅक्सिनेशन लसीकरण हे फिल्डमध्येही सुरू करण्यात आले असून त्यात सोयगाव, संगमेश्वर, कॅम्प या ३ नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून लसीकरण घेण्यात येत आहे.
     तसेच सेव्ह द चिल्ड्रन या संस्थेने मनपा बरोबर "हॅन्ड वॉश" या कार्यक्रमाच्या माध्यमातून  आशा कर्मचारी यांची मदत घेऊन घरोघरी साबनांचे वाटप करण्यात आले व हात कसे धुवायचे याबाबत शहरवासीयांना मार्गदर्शन केले त्यांचे काम उल्लेखनीय आहे.
 तरी जनतेने स्वतःच्या व आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी आपल्या जवळच्या नागरी आरोग्य केंद्र येथे जावून कोवीड-१९ लस घेवून मनपास सहकार्य करावे.

*मा.अलका भावसार,R.C.H. ऑफिसर:-*
"सेव्ह द चिल्ड्रन" या संस्थेने मालेगाव महानगरपालिकेस ०२ व्हॅन उपलब्ध करून दिले असून या दोन्ही व्हॅन यांची कोव्हीड-१९ व्हॅक्सिनेशन जनजागृती करणे कामी मदत होणार आहे.
"सेव्ह द चिल्ड्रन" या संस्थेने यापूर्वी गरोदर माता स्तनमाता तसेच ०५ वर्ष पर्यंतच्या लहान मुलांना साबणाचा वापर कसा करायचा याबाबत ठिकाणी जनजागृती केलेली आहे.
दर मंगळवारी नागरी आरोग्य केंद्र येथे गरोदर मातांची तपासणी असते त्या ठिकाणी जाऊन गरोदर मातांनी आपले कोव्हीड-१९ व्हॅक्सिनेशन करून घ्यावे यामुळे येणारे बालक सुरक्षित राहील तसेच पुढे बालक झाल्यावर त्यांचे नियमितपणे लसीकरण पूर्ण करून घ्यावे जेणेकरून बालकाचे साथीच्या आजारापासून संरक्षण होईल.
कोव्हीड-१९ व्हॅक्सिनेशन चे प्रमाण मालेगाव शहरात खूपच कमी प्रमाणात असल्याने ते वाढविणे गरजेचे आहे यामुळे शहरातील १८ वर्षावरील नागरिकांनी कोव्हीड-१९ व्हॅक्सिन घेवून लसीकरणाचे प्रमाण १००% कसे करता येईल याकरीता मनपास सहकार्य करावे.

सदर कार्यक्रमा प्रसंगी मा.सहा.आयुक्त (अतिक्रमण) तथा जनसंपर्क अधिकारी हरीश डिंबर, मा.लेखापरिक्षक सुनिल खडके व आदी आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

आमदार फारूक शाह यांच्या विकास कामांचा धडाका सुरूच.

आमदार फारूक शाह यांच्या विकास कामांचा धडाका सुरूच. महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयी सुविधांचा विकास योजने अंतर्गत धुळे शहरासाठी ५ कोटी मंज...