मालेगाव महानगर पालिका येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न
मालेगाव विधी सेवा सामिती व मालेगांव वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मा.आयुक्त भालचंद्र गोसावी यांचे मार्गदर्शनानुसार पॕन इंडिया अवेरनेस या उपक्रमांतर्गत सर्वसामान्य लोकांना कायदेविषयक जनजागृती व मार्गदर्शन मिळावे यासाठी मालेगाव महानगर पालिका सभागृहात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष मा. शा. भा. बहाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव विधी सेवा समिती व तालुका वकील संघाचे अध्यक्ष अँड.श्री.बाळासाहेब पाटील, अँड, भास्कर तिवारी, अँड, राजेंद्र भामरे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
सदर शिबिरात आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडली जावी. कायदेविषयक माहिती सामान्य जनतेला ज्ञात असल्यास न्याय मिळण्याची प्रक्रिया सुखकर होते व न्याय जरूर मिळतो. हा आशावाद शहरी भागात पोहचवण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी वकील संघाचे अध्यक्ष adv. श्री.बाळासाहेब पाटील यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले.
मालेगांव वकील संघाचे अध्यक्ष अॕड. बाळासाहेब पाटील यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाची आवश्यकता आणि उद्देश याविषयी मार्गदर्शन केले.
शिबीर यशस्वीतेसाठी वकील संघाचे अध्यक्ष. अॕड. बाळासाहेब पाटील, विधी सेवा समितीचे जागरूकता, आवश्यकता, यावर मार्गदर्शन केले.अॕड.भास्कर तिवारी, अँड.राजेद्र भामरे यांनी समाजाचे दाखले देऊन मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सचिन महाले मा.आयुक्त यांचे स्वीय सहाय्यक व सिरिन मेश्राम कनिष्ठ लिपिक यांनी केले.
पि.एल.वी.श्री.योगेश नेमनार यांनी कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले.
म.न.पा.चे. उपायुक्त मूल्यनिर्धारण कर संकलन अधिकारी तथा लेखाधिकारी राजु खैरनार यांनी आभार मानले
मा.आयुक्त श्री.भालचंद्र गोसावी व मा. अतिरिक्त आयुक्त डॉ.बाबुराव बिक्कड तसेच मा.उपायुक्त श्री.राहुल पाटील यांच्या दिशा निर्देशाने व मार्गदर्शनाखाली मा. उपायुक्त मुल्य निर्धारण कर संकलन अधिकारी तथा लेखाधिकारी राजू खैरणार, व सहाय्यक आयुक्त (अतिक्रमण) तथा जनसंपर्क अधिकारी हरिश डिंबर,
सहाय्यक आयुक्त (स्वच्छता) अनिल पारखे,शहर अभियंता कैलास बच्छाव, विद्युत अधीक्षक अभिजीत पवार, उपअभियंता जयपाल त्रिभुवन उपाभियंता सचिव माळवाळ, उपाभियंता शांताराम चौरे, नगररचनाकार संजय जाधव, आस्थापना पर्यवेक्षक तौसीफ शेख, उद्यान अधीक्षक निलेश पाटिल मा. आयुक्त यांचे स्वीय सहाय्यक सचिन महाले, आदि अधिकारी कर्मचारी बैठकीस उपस्थित होते.
No comments:
Post a Comment