Monday, 4 October 2021

पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती। होऊनिया बेहोश धावलो ध्येयपथावरती’ या ध्येयाने धावणा-या पिढीचे प्रतिनिधी आणि साने गुरुजींचा एक धडपडणाऱ्या मुलांपैकी एक मुलगा यदुनाथ थत्ते यांचा आज जन्मदिन.

'पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती। होऊनिया बेहोश धावलो ध्येयपथावरती’ या ध्येयाने धावणा-या पिढीचे प्रतिनिधी आणि साने गुरुजींचा एक धडपडणाऱ्या मुलांपैकी एक मुलगा यदुनाथ थत्ते यांचा आज जन्मदिन.
नाशिक जिल्ह्यातील येवले येथे दि. ५ ऑक्टोबर १९२२ रोजी त्यांचा जन्म झाला. महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच त्यांनी १९४२ च्या आंदोलनात उडी घेतली. कारावासही भोगला. स्वातंत्र्योत्तर काळात साने गुरुजी आणि आचार्य विनोबांची शिकवण उराशी घेऊन ती आचरणात आणली. १९५६ ते ८२ पर्यंत साने गुरुजींच्या ‘साधना’ साप्ताहिकाचे ते संपादक होते. मराठी, हिंदीतून त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. 

धर्मनिरपेक्ष नीतिशिक्षणाची दिशा दाखविणारे ‘प्रतिज्ञा’, राष्ट्रीयत्वाची जाणीव जागृत करणारे ‘आपला मान, आपला अभिमान’ हे पुस्तक, ही त्यांच्या पुरस्कारप्राप्त ग्रंथाची ठळक उदाहरणे. केंद्र व राज्य शासनाचे अनेक पुरस्कार त्यांना लाभले. त्यांच्या एका ग्रंथाला ‘सुधारकाग्रणी गोपाळ गणेश आगरकर सुवर्णपदक’ही लाभले. 

साने गुरुजी कथामाला, बाबा आमटेंची भारतजोडो यात्रा, निगडित असणारे थत्ते ‘प्रेस कौन्सिल’चे अध्यक्षही होते. ‘साधना’ला मराठी वृत्तपत्रसृष्टीत वैचारिक प्रतिष्ठा मिळवून देणारे संपादक १० आॅक्टोंबर रोजी दिवंगत झाले.

#जन्मशताब्दी_वर्ष

No comments:

Post a Comment

आमदार फारूक शाह यांच्या विकास कामांचा धडाका सुरूच.

आमदार फारूक शाह यांच्या विकास कामांचा धडाका सुरूच. महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयी सुविधांचा विकास योजने अंतर्गत धुळे शहरासाठी ५ कोटी मंज...