Tuesday, 5 October 2021

काकांनी कन्या विद्यालयतील माजी विधार्थीनीने आपल्या अखंड ज्ञानसाधनेने सातासमुद्रपार भविष्य घडवले.


ज्ञानाचे द्वार अटकेपार
काकांनी कन्या विद्यालयतील माजी विधार्थीनीने आपल्या अखंड ज्ञानसाधनेने सातासमुद्रपार भविष्य घडवले.
  कु. जान्हवी जयवंत कुलकर्णी सौ. रु. झुं. काकाणी कन्या ही या शाळेची माजी विद्यार्थिनी असून ती सध्या UNITED KINGDOM येथे एका नामांकित बायोमेडिकल  कंपनीमध्ये मॅनेजर या पदापर्यंत पोहोचलेली आहे. सर्वसामान्य विद्यार्थिनींनी बरोबर राहून मराठी मिडीयम च्या शाळेत शिकून सुद्धा आपण या पदापर्यंत पोहोचू शकतो. काकाणी विद्यालयातील विद्यार्थी अनेक देशांमध्ये आज कार्यरत असून अजून एक मानाचा झेंडा मालेगाव एजुकेशन सोसायटीच्या विद्यालयच्या इतिहासात रोवला गेलेला आहे व तो जान्हवीच्या रुपाने गेला. यानिमित्ताने शाळेकडून तिचा सत्कार आयोजित करण्यात आलेला होता
 त्या प्रसंगी जान्हवीची आई प्राध्यापिका शुभदा कुलकर्णी मॅडम ,बहीण सौ केतकी ,संस्थेचे अध्यक्ष श्री. विलासराव पुरोहित,  चेअरमन श्री. प्रकाशराव दातार कोषाध्यक्ष श्री. रामनिवासजी सोनी, जेष्ठ संचालक श्री प्रल्हादजी शर्मा,श्री. गोविंदभाऊ तापडिया. तसेच मुख्याध्यपिका सौ. मोरे एस. पी. कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रभारी प्रचार्या सौ. अस्मर एस. डी. व नवीन प्रा. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मंडळ मॅडम या उपस्थित होत्या. सूत्र संचालन श्री.संदीप  दुसाने सर यांनी केले. त्यानंतर जान्हवीने तिचा परदेशातील विविध अनुभव, व्यावसायिक प्रवास सांगून आपले मनोगत व्यक्त केले. डॉक्टर पुरोहित यांनी अध्यक्षीय भाषणातून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आभार.
मुख्याध्यापिका सौ शोभा मोरे  यांनी मानले.

No comments:

Post a Comment

आमदार फारूक शाह यांच्या विकास कामांचा धडाका सुरूच.

आमदार फारूक शाह यांच्या विकास कामांचा धडाका सुरूच. महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयी सुविधांचा विकास योजने अंतर्गत धुळे शहरासाठी ५ कोटी मंज...