Thursday, 28 October 2021

नवीन बस स्टॅन्ड परिसरातील अतिक्रमण धारकांवर कारवाई

नवीन बस स्टॅन्ड परिसरातील अतिक्रमण धारकांवर कारवाई
महापालिका क्षेत्रातील  नवीन बस स्टँड आणि उड्डाणपुलाखालील परिसरातील अतिशय वर्दळीचा असलेला रस्ता या रस्त्याच्या आजूबाजूला बस स्टॅन्ड, शाळा,मार्केट असा परिसर असल्याने याबाबत तेथील स्थानिक नागरिकांच्या अतिक्रमण काढणेकामी वेळोवेळी तक्रारी येत होत्या त्या अनुषंगाने संबंधित अतिक्रमण धारकांना रस्त्यावर करण्यात आलेले अतिक्रमण काढणे बाबत पोलीस पोलिस प्रशासनाच्या वतीने नोटिसाही बजावण्यात आल्या होत्या. मात्र तरीही सदरील अतिक्रमण धारकांनी आपले  अतिक्रमण काढले नसल्याने मा. आयुक्त भालचंद्र गोसावी यांच्या आदेशान्वये आज दिनांक 27/10/2021 गुरुवार रोजी  मनपाचे सहाय्यक आयुक्त हरिष डिंबर (अतिक्रमण) व शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब घुसर साहेब यांच्या उपस्थितीत महापालिकेचे अतिक्रमण पथक कर्मचारी व पोलिस प्रशासनाच्या (स्पेशल पोलीस फोर्स) च्या मदतीने अतिक्रमण काढण्याची कारवाई केलेली आहे.
जवळपास पंचवीस तीस  ठेलागाडी व इतर अतिक्रमण हटविण्यात आलेले आहे.

No comments:

Post a Comment

आमदार फारूक शाह यांच्या विकास कामांचा धडाका सुरूच.

आमदार फारूक शाह यांच्या विकास कामांचा धडाका सुरूच. महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयी सुविधांचा विकास योजने अंतर्गत धुळे शहरासाठी ५ कोटी मंज...