Friday, 10 September 2021

अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तर्फे आयुक्तांना देण्यात आले

मालेगाव शहरात  आजच्या घडीला नागरी समस्या मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. नागरिक महानगरपालिकेच्या नावाने बोंबाबोंब करीत आहेत, शहरातील सुविधांसाठी अक्षरशा वणवा झालेला आहे.रस्त्यावर खड्डे आहेत की रस्ते खड्ड्यात आहेत ते समजत नाही तात्पुरती डागडुजी करून समस्यांचे निवारण होणारे नाही याकरिता ठोस कार्यवाही होणे आवश्यक आहेआहे
     शहरातील स्वच्छता हा सर्वात मोठा विषय आहे .मोठा गाजावाजा करीत स्वच्छतेचा ठेका दिला परंतु स्वच्छतेच्या नावाने व अस्वच्छताच मोठ्या प्रमाणात आहे. घंटागाडी कधीच वेळेवर येत नाहीत. कचरा उचलला जात नाही. फवारणी होत नाही. आजच्या घडीला शहरातील प्रत्येक दवाखान्यात फक्त डेंग्यू आणि व्हायरल व्हायरल इन्फेक्शन चे रुग्ण आढळून येत आहे. रस्ता व गटार स्वच्छतेसाठी ठेका दिला परंतु मालेगाव शहरातील रस्ता स्वच्छ दिसत नाही. मुळातच मालेगाव शहराची ओळखही बकाल व स्वच्छता अशीच आहे, ही ओळख कधी कधी बदलणार. एवढ्या प्रमाणात निधी स्वच्छतेसाठी खर्च होत असून त्याचा फायदा होताना दिसत नाही.
      मालेगाव शहराची किमान स्वच्छता, खड्डेमुक्त रस्ते, आरोग्य, स्वच्छता, पिण्याचे पाणी, पथदीप इत्यादी शहरवासीयांना मिळवली इच्छा. सटाणा रोड वरील सुशोभीकरण व लाईट सुरुवातीच्या काळात सुरू राहिले त्यानंतर ते कधी सुरू झाले नाहीत.
     मालेगाव शहरातील नागरिकांना कराचा भरणा नुसार किमान मूलभूत सुविधा तरी दर्जेदार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न व्हावा. अन्यथा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मालेगाव करून आंदोलन उभारण्यात येईल महानगरपालिकेसमोर मागणी पूर्ण होईपावेतो धरणे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
    अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तर्फे आयुक्तांना देण्यात आले त्यानुसार आयुक्तांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले की येणाऱ्या सोमवार दि.१४ सप्टेंबर पासून संपूर्ण मालेगाव शहरात मालेगाव शहर स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल,जंतू नाशक औषधेफवारणी,धुराळणी बाबत ड्रॅईव्ह आराखडा नुसार करण्यात येईल असे आश्वासन माननीय आयुक्त यांनी यावेळी दिले शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस मालेगाव महानगर कार्याध्यक्ष अनंत भोसले, राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव दिनेश ठाकरे, अनिल पाटील त्र्यंबक पाटील, मोहन कांबळे, संदीप पाटील, दिनेश गवळी, रामदास बच्छाव आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 

No comments:

Post a Comment

आमदार फारूक शाह यांच्या विकास कामांचा धडाका सुरूच.

आमदार फारूक शाह यांच्या विकास कामांचा धडाका सुरूच. महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयी सुविधांचा विकास योजने अंतर्गत धुळे शहरासाठी ५ कोटी मंज...