भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयच्या अधिष्ठाता व संबंधितांच्या भ्रष्टकारभाराची चौकशी होणार. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आमदार फारूक शाह यांना दिली ग्वाही .
धुळे (दि.०७-०९-२०२१) कोरोना काळात केंद्र शासन व राज्य शासनाकडून कोट्यावधीचा निधी प्राप्त होऊन सुद्धा रूग्णांना त्या प्रकारे सुविधा मिळालेल्या नाही या निधी मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असून शासनाने याची चौकशी करणेसाठी उच्च स्तरीय चौकशी समिती नेमावी. अशी मागणी आमदार फारूक शाह यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख साहेब यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात शासनाकडून येणाऱ्या औषधांमध्ये व इतर वैद्यकीय साहीत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून याची सुद्धा उच्चस्तरीय चौकशी समिती मार्फत चौकशी करण्यात यावी. करोना काळात विशीष्ट खाजगी लॅब चे नमुने (स्वॅब) भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात तपासणी साठी येत होते.प्रत्यक्षात खाजगी लॅब कडून मोठ्या प्रमाणात पैसा वसूल करण्यात येत होता.दि.१८-०८-२०२१ रोजी भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय येथे प्रसूतीसाठी गेलेल्या महिलेला व त्यांच्या नातेवाईकाना सुरक्षा रक्षकांनी जबरदस्त मारहाण केली व जिल्हा रुग्णालयातून हाकलून देण्यात आले अश्या प्रकारचे अशोभनीय काम चालू आहे. तसेच डॉ. राजकुमार सूर्यवंशी हे १ वर्षभरापूर्वी सेवा निवृत्त झालेले असून सुद्धा अधिष्ठाता यांच्या मर्जीच्या असल्याने ते आजतागायत कार्यरत आहे. रुग्ण व नातेवाईकाना डॉ. सूर्यवंशीच्या उद्धटपानाच्या वर्तुणीकीचा अनुभव आलेला आहे. कोरोना महामारीच्या काळात अनेक सेवाभावी संस्थांनी PPE किट सर्वोपचार रुग्णालयास दान स्वरुपात दिलेले होते मात्र भा.हि.शा.वै.म व सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाने सदर PPE किट ची खरेदी दाखवून भ्रष्टाचार केलेला आहे. भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरले असून रुग्ण व त्यांचे नातेवाईक जीव मुठीत घेऊन या रुग्णालयात उपचार घेत असतात. सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात डेंग्यू व चिकन गुनियाचे रुग्ण असताना सर्वोपचार रुग्णालयातील प्रशासन उपचार देण्यास असमर्थ ठरत आहे.तसेच अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांवर वचक राहिलेला नाही.हिरे मेडिकलच्या अधिष्ठाता डॉ.पल्लवी सापळे हे रुग्णांना उद्धटपणाची वागणूक देत असतात तसेच रुग्णाच्या अडी अडचणी संदर्भात रुग्णाच्या नातेवाईकांना भेटायचे टाळतात तसेच रुग्णाच्या समस्या जाणून घेत नाही. अश्या अनेक तक्रारी आमच्या आमदार कार्यालयाला प्राप्त झालेल्या आहे.
तरी उपरोक्त मुद्यांबाबत विशेष चौकशी समिती नेमून अधिष्ठाता डॉ.पल्लवी सापळे, डॉ.दीपक शेजवळ व डॉ.राजकुमार सूर्यवंशी यांची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार फारूक शाह यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख साहेब यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून केली त्याला सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच संबंधितांवर चौकशी करण्यात येईल असे आश्वासन दिले.
No comments:
Post a Comment