AIMIM पक्षाच्या वतीने श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय व वैद्यकीय महाविद्यालयात असलेल्या ज्वलंत प्रश्नांवर अधिष्ठाता पल्लवी सापळे यांना घेराव.
८ दिवसात करा सुधारणा अन्यथा आंदोलन
(धुळे दि. ०३-०९-२०२१) श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय व वैद्यकीय महाविद्यालय धुळेच्या आवारात आणि सर्वच वार्डांमध्ये घाणीचे साम्राज्य झालेले असून यामुळे दुर्गंधी पसरली आहे. रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना देखील आजाराची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी आपणास विनंती कि श्री. भा. हिरे शासकीय व वैद्यकीय महाविद्यालय धुळेच्या आवारात आणि वार्डांमध्ये असलेल्या घाणीचे साम्राज्य कायमस्वरूपी दूर करण्यात यावे आणि अशिक्षित रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक रुग्णाच्या बाबतीत प्रश्न करतात त्यावर या ठिकाणी काम करणारे काहीजण रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना अरेरावीची आणि अर्वाच्य भाषेत बोलतात अश्या देखील तक्रारी असून अश्या वृत्तीच्या लोकांचा देखील बंदोबस्त करण्यात अशी मागणी करून घेराव करण्यात आला.
याप्रसंगी धुळे मनपाचे नगसेवक युसुफ मुल्ला, माजी नगरसेवक साबीर पत्रकार, माजी नगरसेवक साजिद शाही, आमीर पठाण, शहराध्यक्ष नुरा ठेकेदार, महिला जिल्हाध्यक्ष डॉ. दीपश्री नाईक, धुळे महिला शहराध्यक्ष फातेमा अन्सारी, लिना काटे, मनिषा जगताप, युवा जिल्हाध्यक्ष वसीम अक्रम, जुनेद पठाण, सऊद सरदार, वसीम पिंजारी, मोईन शेख आदींसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
No comments:
Post a Comment