महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशनच्या) उपाध्यक्षपदी तसेच नाशिक विभाग माध्यमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी आर.डी.निकम यांची निवड
काल रविवार दिनांक 29.8.2021 रोजी, पुणे येथे सदाशिव पेठेतील पुणे विद्यार्थी गृहाच्या, महाराष्ट्र माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशनचे अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर कानडे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशनची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली,बैठकीत शासनाकडे प्रलंबित असलेल्या शिक्षकांच्या विविध मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली,कोरोना काळात मृत्यू पावलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व प्रकारचे लाभ देण्यात यावेत, सुट्टीच्या काळात ज्या कर्मचाऱ्यांनी कोरोना योद्धा म्हणून काम केलेले आहे त्या कामाची सेवा पुस्तकात नोंद करण्यात यावी,तसेच इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 50 लाखाचे विमा कवच देण्यात यावे,सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी,आधार कार्ड प्रमाणे करण्यात येणाऱ्या संच मान्यतेस तूर्त स्थगिती देण्यात यावी,डीसीपीएस योजनेचे एनपीएस योजनेत रुपांतर झाल्याने त्याचा सर्व सविस्तर हिशेब शिक्षक कर्मचाऱ्यांना देण्यात यावा, सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी तात्काळ दुरुस्त करण्यात याव्यात, केंद्राप्रमाणे प्रलंबित महागाई भत्ता थकबाकीसह तात्काळ देण्यात यावा, प्रशिक्षणाची अट रद्द करून वरिष्ठ व निवड श्रेणी तात्काळ मंजूर करण्यात याव्यात,जवळपास पाच तास चाललेल्या बैठकीत यासह अनेक विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
*या वेळी राज्य पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ फेरेशनच्या उपाध्यक्षपदी व नाशिक विभाग माध्यमिक शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी आर.डी. निकम यांची तसेच कोकण विभाग माध्यमिक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षपदी नरसु पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली*
याप्रसंगी फेडरेशनचे कार्यवाह, शालिग्राम भिरूड, फेडरेशनचे उपाध्यक्ष हनुमंतराव भोसले,कोषाध्यक्ष राजेंद्र लांडे पाटील,यांच्यासह राज्यभरातील फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते, या बैठकीसाठी नाशिक जिल्ह्यांमधून नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष टी.एम.डोंगरे,कार्यवाह चंद्रकांत कुशारे, मोहन चकोर,राज्य समन्वयक,नीलेश ठाकूर, प्रदीपसिंह पाटील,संजय गिते बाळासाहेब देवरे, त्रंबक मार्तंड,अरुण पवार, सचिन शेवाळे,भाऊसाहेब शिरसाठ, रमेश घोडके, अतुल आढाव, सि.डी.अहिरे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment