Saturday, 21 August 2021

काकाणी कन्या विद्यालयाचे एन.एम.एस.एस. परीक्षेत उज्वल यश 
सन मध्ये २०२०- २१ मध्ये शासनातर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक प्रज्ञावंत परीक्षा ( एन. एम. एस. एस. ) या परीक्षे करीता सौ.रु. झुं. काकाणी कन्या विद्यालयातील इ. ८ वी वर्गातून एकूण ४ विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या होत्या.
  काल दिनांक १८/०८/२०२१ रोजी सदर परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या निकालात विद्यालयाची कु. मनस्वी धनंजय अभोणकर हिने गुणवत्तायादीत ३१ वे स्थान मिळवून शिष्यवृत्ती मिळण्यास पात्र ठरली.
  कु. मनस्वी हीस विज्ञान शिक्षक श्री. सुधीर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. मालेगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. श्री. विलासजी पुरोहित, चेअरमन श्री. प्रकाशजी दातार सेक्रेटरी, श्री. सतीशजी कलंत्री तसेच सर्व संचालक मंडळ मुख्याध्यापिका सौ. शोभा मोरे, पर्यवेक्षक श्री. राजेश परदेशी तसेच सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी यांनी कु. मनस्वी अभोणकर हिचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

आमदार फारूक शाह यांच्या विकास कामांचा धडाका सुरूच.

आमदार फारूक शाह यांच्या विकास कामांचा धडाका सुरूच. महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयी सुविधांचा विकास योजने अंतर्गत धुळे शहरासाठी ५ कोटी मंज...