Wednesday, 20 October 2021

मॉडेल्स शंभर खाटांचे कॅम्प रुग्णालयासाठी जागेची पाहणी

कृषी मंत्री दादा भुसे यांच्या माध्यमातून अमेरीकन इंडिया फाउंडेशन ट्रस्टने त्यांच्या सीएसआर फंडातून सुमारे पाच कोटी रुपये खर्चाचे 100 खाटांचे रुग्णालय उभारण्यास मान्यता दिली आहे. तसेच रुग्णालयास निधी खर्चाला मान्यता मिळाली असून याकरिता मनपा महासभेने ही रुग्णालय उभारण्यास मंजुरी दिलेली आहे.
ट्रस्ट कडून ठेकेदार नियुक्त होऊन मॉडेल्स पद्धतीने रुग्णालय उभारले जाणार आहे यासाठी महापालिकेला  मात्र सुलबी प्राथमिक बांधकाम करून द्यावे लागेल.
तसेच रुग्णालयास पायाभूत सुविधा देण्याची जबाबदारी महापालिकेची असल्याने याकरिता आज मंगळवार दिनांक १९/१०/२०२१ रोजी आयुक्त भालचंद्र गोसावी व सर्व संबंधित जबाबदार अधिकारी यांनी जागेवर जाऊन जागेची पाहणी केली असता "सोमवार बाजार येथे सध्याचा पालिकेच्या रुग्णालयात जवळ असलेल्या गावठाण क्षेत्रावर सुमारे वीस हजार वर्गफूट जागेत हे रुग्णालय प्रस्तावित करायाचे आहे किंवा यास विकल्प म्हणून मनपा मालकीच्या इतर जागेवर रुग्णालय उभारले जाऊ शकते किंवा कसे याबाबत विचारमंथनही करण्यात आले." 
 तसेच कॅम्प हॉस्पिटल मध्ये रुग्णांना देण्यात येत असलेल्या सेवा सुविधा व तेथील समस्या बाबत स्टाफ अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून माहिती जाणून घेतली शीवाय चर्चा करून त्यांनाही रुग्णांना सेवा देणेबाबत आवश्यक त्या सूचना केल्यात.
या दौऱ्या प्रसंगी उपस्थित अधिकारी
सहा.आयुक्त (स्वच्छता) अनिल पारखे, सहा.(अतिक्रमण) तथा जनसंपर्क अधिकारी हरिश डींबर,  
आरोग्याधिकारी श्रीमती.डॉ सपना ठाकरे, शहर अभियंता - कैलास बच्छाव, उपअभियंता (आय.एच.एस डी.पी.) - सचिन माळवाळ, उपअभियंता (नगररचनाकार) संजय जाधव   (उपाभियंता पा.पु) जयपाल त्रिभवन (उपाभियंता,विद्युत) अभिजित पवार, आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

आमदार फारूक शाह यांच्या विकास कामांचा धडाका सुरूच.

आमदार फारूक शाह यांच्या विकास कामांचा धडाका सुरूच. महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयी सुविधांचा विकास योजने अंतर्गत धुळे शहरासाठी ५ कोटी मंज...