Thursday, 21 October 2021

महानगरपालिकेतर्फे कोवीड लसीकरण केंद्रावर आलेले लाभार्थ्यांचे स्वागत

महानगरपालिकेतर्फे कोवीड लसीकरण केंद्रावर आलेले लाभार्थ्यांचे स्वागत
करोना महामारीविरुद्धच्या युद्धात देशाने एक मोठी कामगिरी साध्य केली आहे. भारतातील लसीकरणाचा आकडा आज १०० कोटी टप्पा पार केला आहे. करोना लसीकरणाचे १०० कोटींचा टप्पा पार करून आज इतिहास रचला आहे. या निमित्ताने अनेक ठिकाणी उत्सव साजरा करण्याची तयारी केली जात आहे १०० कोटी डोसचा विक्रम साजरा करण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार मार्फत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  या कार्यक्रमाचा सहभाग म्हणून मालेगाव महानगरपालिकेने एन.एन.वाडिया-2 कोवीड लसीकरण केंद्रावर आलेले *100 वे लाभार्थी श्री यु.आर.पाटील व श्रीमती प्रमिला पाटील* यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित  ‌ R.C.H. ऑफिसर डॉ.अलका भावसार, डॉ.पंकज शिंपी, व आदी आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

आमदार फारूक शाह यांच्या विकास कामांचा धडाका सुरूच.

आमदार फारूक शाह यांच्या विकास कामांचा धडाका सुरूच. महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयी सुविधांचा विकास योजने अंतर्गत धुळे शहरासाठी ५ कोटी मंज...