Tuesday, 5 October 2021

आंदोलक शेतकाऱ्यांना धमकी देतात याचा निषेध


भारताचे केंदीय गृहराज्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे
 खासदार अजय मिस्रा उर्फ टेनी यांनी जाहीर भाषणात आंदोलक शेतकाऱ्यांना धमकी देतात याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलक शेतकरी उत्तरप्रदेश येथील लखीमपूर खीर येथे उत्तरप्रदेश चे उप-मुख्यमंत्री केशव मौर्य आणि विवादित वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिस्रा यांच्या नियोजित कार्यक्रमाला काळे झेंडे दाखविण्यासाठी एकत्र येतात त्या ठिकाणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अभिषेक मिस्रा हा बेदरकार गाडी चालवीत आंदोलक शेतकरयांना उद्दामपणे चिरडून टाकतो,त्यात ९ शेतकरी मृत्यमुखी पडतात हा सर्व प्रकार चीड आणणारा आहे.
      देशाच्या कायदा-सु व्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी असणाऱ्या केंद्रीय गृहराज्यमंत्री यांनी शेतकाऱ्यांना मारण्याची भाषा करावी आणि त्याच्या पुत्राने शेतकऱ्यांचा खून पाडावा हे लोकशाही असलेल्या भारत देशाला काळिमा फासण्याचा प्रकार आहे.हा शेतकऱयांचा खून नसून लोकशाही चा खून पडला आहे.
      मागील एक वर्षांपासून काळ्या कृषी कायद्या विरोधात शेतकरी आंदोलन करीत आहे त्यांच्या व्यथा दूर करण्याचे सोडून त्यांनाच मारण्याचा प्रकार हा हुकूमशाही प्रवृत्तीचे लक्षण आहे याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव दिनेश ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अप्पर जिल्हाधिकारी,मालेगाव यांना निवेदन दिले निवेदनात घटनेचा निषेध आणि दोघा मंत्र्याचा राजीनामा आणि मंत्री आणि त्यांच्या मुलावर खुनाचा दाखल करून अटक करण्याची मागणी केली.या प्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात केंद्र शासन आणि उत्तरप्रदेश सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
   शिष्टमंडळात  रायुका प्रदेश सचिव दिनेश ठाकरे,राष्ट्रवादी ओबीसी सेल तालुकाध्यक्ष प्रकाश वाघ,युवक कार्याध्यक्ष मनमोहन शेवाळे,किशोर इंगळे, पांडुरंग भदाणे,सुशील कांबळे,आंबू दादा निकम,सुभाष आहिरे,संभाजी बोरसे,संदीप पाटील,रामदास बच्छाव,शुभम खैरनार,शिवम पाटील,प्रणव अभोणकर,अक्षय पाटील,सागर पाटील आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

आमदार फारूक शाह यांच्या विकास कामांचा धडाका सुरूच.

आमदार फारूक शाह यांच्या विकास कामांचा धडाका सुरूच. महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयी सुविधांचा विकास योजने अंतर्गत धुळे शहरासाठी ५ कोटी मंज...