Saturday, 4 September 2021

आमदार फारूक शाह यांच्या हस्ते एकता शिवभोजन केंद्राचे उद्घाटन

आमदार फारूक शाह यांच्या हस्ते एकता शिवभोजन केंद्राचे उद्घाटन
धुळे (दि.०४-०९-२०२१) धुळे शहरातील भीम नगर हा भाग गरीब वस्तीचा असून परिसरात हात मजुरीवर काम करणारे लोक राहतात तसेच या भागात दवाखाने असल्याने गरीब व गरजू रुग्ण व त्यांचे नातेवाईकांना या भागात जेवणासाठी इतरत्र भटकंती करावी लागते. हि परिस्थिती बघून धुळे शहराचे आमदार फारूक शाह साहेब यांनी या भागात गरजू लोकांसाठी जेवणाची सोय व्हावी म्हणून शासनाकडे शिवभोजन ची मागणी केली होती. त्याला योग्य तो प्रतिसाद देत येथे शिवभोजन मंजूर करण्यात आले त्याचे आज आमदार फारूक शाह साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी या भागातील लोकांनी आमदार साहेबांचे आभार मानले व समाधान व्यक्त केले. या उद्घाटन कार्यकर्माच्या वेळी आमदार फारूक शाह, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ साहेब, माजी नगरसेवक जितु शिरसाठ, संजय वाल्हे, निलेश काटे जिल्हाध्यक्ष युसुफ मुल्ला, नगरसेवक नासीर पठाण, सईद बेग, गनी डॉलर, माजी नगरसेवक साबीर सैय्यद,साजिद साई,आमिर पठाण,महिला जिल्हाध्यक्ष डॉ. दीपश्री नाईक, महिला शहराध्यक्ष फातेमा अन्सारी, शहराध्यक्ष नुरा शेख, शहबाज शाह, आसिफ शाह,कैसर पेंटर,चिराग खतीब,जुनैद पठाण आदी उपस्थित होते.



No comments:

Post a Comment

आमदार फारूक शाह यांच्या विकास कामांचा धडाका सुरूच.

आमदार फारूक शाह यांच्या विकास कामांचा धडाका सुरूच. महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयी सुविधांचा विकास योजने अंतर्गत धुळे शहरासाठी ५ कोटी मंज...