Wednesday, 18 August 2021

मालेगाव मनपा महिला व बालकल्याण सभापती पदी शिवसेनेच्या सौ.पुष्पा राजेश गंगावणे यांची निवड

मालेगाव मनपा महिला व बालकल्याण सभापती पदी शिवसेनेच्या सौ.पुष्पा राजेश गंगावणे यांची निवड
मालेगांव –आज दि.18.08.2021 रोजी मालेगाव महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समिती सभापतीची मा.जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व मनपा आयुक्त-भालचंद्र गोसावी, उपायुक्त राहुल पाटील, नगरसचिव शाम बुरकुल यांच्या उपस्थितीत दुरदृश्य प्रणालीद्वारे निवडणुक पार पाडली. या निवडणुकीत शिवसेनेच्या सौ.पुष्पा राजेश गंगावणे यांची महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी निवड झाली. 
काँग्रेस व भाजपच्या चार सदस्यांनी शिवसेनेच्या सौ.गंगावणे यांना मतदान करुन विजय केले. यावेळी सदस्य रजिया बेगम अब्दुल माजिद, हमिदा शेख जब्बार, शबाना शेख सलीम व सुवर्णा राजेंद्र शेलार यांनी मतदान केले.
तसेच महाराष्ट्र राज्याचे कृषि व माजी सैनिक कल्याण मंत्री ना.दादाजी भुसे यांनी दुरध्वनीद्वारे सौ.पुष्पा गंगावणे यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या व मनपाचे महापौर ताहेरा रशीद शेख व मा.आ.रशीद शेख यांनी सत्कार केला.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रमोद शुक्ला, तालुकाप्रमुख संजय दुसाने, महानगरप्रमुख रामा मिस्तरी, युवासेना जिल्हाप्रमुख विनोद वाघ, युवासेना विस्तारक अविष्कार भुसे, नगरसेवक सखाराम घोडके, राजाराम जाधव, जे.पी.बच्छाव, नारायण शिंदे, भिमा भडांगे, नगरसेविका कल्पना वाघ, आशाताई आहिरे, जिजाताई बच्छाव,  राजेश गंगावणे,  भिमा भडांगे, मोहन तिसगे, यशपाल बागुल, गोविंद गवळी, दत्ता चौधरी, अमोल चौधरी, सारंग बोरसे, तसेच शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, महिला आघाडी व कार्यकर्ते उपस्थित होते
.

No comments:

Post a Comment

आमदार फारूक शाह यांच्या विकास कामांचा धडाका सुरूच.

आमदार फारूक शाह यांच्या विकास कामांचा धडाका सुरूच. महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयी सुविधांचा विकास योजने अंतर्गत धुळे शहरासाठी ५ कोटी मंज...