साथी विकास मंडळ सेवा पथकाद्वारे कोकणात पुरग्रस्तांसाठी निधीची मदत
मालेगाव- येथील राष्ट्र सेवा दल संचलित साथी विकास मंडळ सेवा पथकाद्वारे कोकणातील पुरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन करण्यात आले होते.
त्या आवाहनाला प्रतिसाद देत मालेगाव मधून विलास वडगे, सारंग पाठक, राजेंद्र दिघे, नचिकेत कोळपकर, श्रीमती कविता मंडळ, राजीव वडगे, आर. डी. निकम, जयेश शेलार, प्रा. अनिल महाजन, प्रा. रमेश पवार, शरद वामनराव पंडित, भिला महाजन, राजेंद्र लोंढे, यशवंत वाघ आदींच्या सहकार्याने १२ हजार पाचशे रुपयांचा मदत निधी देवरुख, चिपळूण येथील मातृमंदिर या कोकणातील पुरग्रस्तांसाठी मदत कार्य करणाऱ्या राष्ट्र सेवा दल सैनिकांनी उभारलेल्या संस्थेकडे पाठविण्यात आला.
मदत करणाऱ्या सर्व साथींना राष्ट्र सेवा दलाच्या वतीने आयकर सवलत असलेल्या पावतीचे वाटप करण्यात आले. जिल्हाध्यक्ष विलास वडगे, जिल्हा संघटक रविराज सोनार, तालुकाध्यक्ष सुधीर साळुंके, संघटक सारंग पाठक, पूर्णवेळ कार्यकर्ते नचिकेत कोळपकर, सेवा दल मंडळ सदस्य स्वाती वाणी यांनी सर्व दात्यांचे आभार मानले.
No comments:
Post a Comment