Monday, 30 August 2021

स्वातंत्र्य सैनिक उद्यान येथील ४६ लक्ष रुपयांच्या विकास कामांच्या प्रस्तावाला मनपा महासभेने मंजुरी दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार

स्वातंत्र्य सैनिक उद्यान येथील ४६ लक्ष रुपयांच्या विकास कामांच्या प्रस्तावाला मनपा महासभेने मंजुरी दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार 
   गेल्या अनेक महिन्यांपासून संबधित कामासाठी सदोदित पाठपुरावा सुरू होता. अमृत रिफर्म मध्ये कामाचा समावेश करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आला असता निधी वितरित करण्याची कायदेशीर अडचण निर्माण झाली. मनपा व शासन यांच्याकडून कोरोना काळात कामास मंजुरी मिळू शकली नव्हती. उशिरा का होईना आज नगर उथान योजनेत सहभागी करण्याच्या मनपा प्रशासनातर्फे सादर विषयाला मंजुरी मिळाली.
        स्वातंत्र्य सैनिक उद्यान विकास  कामास मंजुरी देऊन मालेगाव महानगर पालिकेच्या हद्दीत भारत स्वातंत्र्य संग्रामात योगदान देणाऱ्या थोर क्रांतिकारकांचे स्मारक विकसित करण्यास वाट मोकळी झाली. त्याबद्दल मनपा प्रशासनाचे व मनपा महासभेचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.
     स्वातंत्र्य सैनिक उद्यान विकास कामांचे खरे श्रेय पत्रकार मित्रांचे असून आपण वेळोवेळी बातम्या प्रसिद्ध करून मनपा प्रशासनाचे लक्ष वेधले त्यामुळेच हा विषय महसभेपुढे आला व मंजुरी मिळाली त्याबद्दल आपले हि आभार

  निखिल बाळासाहेब पवार
सदस्य, अखिल भारतीय स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटना नवी दिल्ली

No comments:

Post a Comment

आमदार फारूक शाह यांच्या विकास कामांचा धडाका सुरूच.

आमदार फारूक शाह यांच्या विकास कामांचा धडाका सुरूच. महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयी सुविधांचा विकास योजने अंतर्गत धुळे शहरासाठी ५ कोटी मंज...