शहरातील विविध भागातील नगरे व कॉलोन्यांमधील रहिवाश्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान आमदार फारूक शाह यांच्या सूचनेने नंतर धुळे मनपा आयुक्तांचा सेहबाज फारूक शाह यांच्या समवेत पाहणी दौरा..
आमदार फारूक शाह यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेत केली तात्काळ नुकसान भरपाईची मागणी..!
साधारणतः २००० कुटुंबाना अतिवृष्टीने व ढग फुटीने नुकसान व हानी झाल्याने मोठा फटका..
(धुळे दि. ०१-०९-२०२१) धुळे शहरात काल झालेल्या अतिवृष्टीने व ढगफुटीने धुळे शहरात विविध भागात नुकसान व हानी झाल्याने आज नागरिकांमध्ये आक्रोश पाहण्यास मिळाला. शहरात प्रामुख्याने बिलाल मस्जिदजवळ १०० फुटी रोड, तिरंगा चौक, आझाद नगर, अग्रवाल नगर, मारिया शाळा, नंदी रोड, चित्तरंजन कॉलनी, गजानन कॉलनी, जनता सोसायटी, हजार खोली, जामचा मळा, मौलवी गंज, समता नगर, भाईजी नगर, काजी प्लॉट, देवपूर मधील विटा भट्टी, आधार नगर, अंदरवाली मस्जिद, नेहरू नगर, लक्ष्मीवाडी मिल परिसर व देवपूर तसेच शहरातील विविध भागातील नगरे व कॉलोन्यांमधील रहिवाश्यांचे अन्न धान्य व संसारपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून साधारणतः २००० कुटुंबाना अतिवृष्टीने व ढग फुटीने नुकसान व हानी झाल्याने फटका बसला आहे.
वरील माहिती मिळताच आमदार फारूक शाह यांनी धुळे महानगरपालिका आयुक्त अजीज शेख यांनी माहिती देऊन वरील काही भागात पाहणी करावयास सांगितले आणि नुकसानीचा अंदाज व माहिती घेऊन शहरातील त्रस्त नागरिकांना मदत व सहानुभूती दयावी असे आदेशित केले आणि मुंबई येथे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेत अतिवृष्टीने व ढग फुटीने नुकसान व हानी झालेल्या कुटुंबाना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. या पाहणी दौऱ्याला धुळे महानगरपालिका आयुक्त अजीज शेख यांच्या समवेत अभियंता कैलास शिंदे, नगररचनाकार महेंद्र परदेशी, हेमंत पावटे, सामाजिक कार्यकर्ते सेहबाज फारूक शाह, परवेज शाह, नगरसेवक गनी डॉलर, मनपा विद्युत विभागातील गितेश सोनार, पराग ठाकरे सामाजिक कार्यकर्ते आसिफ पोपट शाह, सिद्धार्थ जगदेव, रईस शाह, रियाज शाह, सउद सरदार आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment